काजूला नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2019

काजूला नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन

काजूला नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन तहसिलदार श्री. रणावरे यांना देताना भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
जानेवारी 2019 ते मे 2019 या कालावधीत बदललेल्या हवामानाचा परिणाम होऊन चंदगड तालुक्यातील काजू या फळ पिकाचे अपरिमित नुकसान झाले आहे. या नुकासानीतून सामान्य शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने मागणीचे निवेदन तहसिलदार विनोद रणावरे यांना देण्यात आले. 
निवेदन स्विकारल्यानंतर तहसीलदार श्री. रणावरे म्हणाले, ``आपण आपल्या खात्यामार्फत आणि कृषी खात्याच्या मदतीने झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून शासनाला कळविणार असल्याचे सांगितले. निवेदन सादर करण्यापूर्वी श्री राम मंदिरात शेतकऱ्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये चंदगडचे रामचंद्र म्हाडगुत, विवेक सबनीस यांच्यासह गडाहिग्लंजचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांचे संघटन वाढविण्यासाठी राम पाटील यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment