सुधाकर निर्मळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2019

सुधाकर निर्मळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावर निवड

सुधाकर निर्मळे
कागल / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांची महाराष्ट्र पत्रकार परिषद मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. ही निवड मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाने सरचिटणीस अनिल महाजन यांनी केली आहे.
सुधाकर निर्मळे यांनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना अडीच वर्षापूर्वी करून कोल्हापूर जिल्हयातील १२ तालुक्यात भक्कम संघटन करीत ५०० पत्रकार सभासद संख्या केली आहे. ते पत्रकारांना शासनस्तरावरील विविध शासकिय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी निवेदनाच्या द्वारे क्रियाशिल आहेत. तसेच जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या उपस्थित २o१७ साली पहिला पत्रकार दिन कणेरी मठावर साजरा करून एकतेचे भावना रूजविली. २०१८ मध्ये कागल व २०१९ मध्ये खिद्रापूर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करून जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १२ पत्रकारांना तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने व ४ पत्रकारांना जिल्हा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करून जिल्हयात एकतेची भावना रूजविली. १o जून २o१७ साली पत्रकार संरक्षण कायदा मार्गदर्शन शिबीर राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करून संपन्न केला.
वरील कार्याची दखल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख साहेबांनी घेऊन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनला मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न करून घेतले.पत्रकाराच्या उन्नतीसाठी राज्यस्तरावर अधिक बळ देण्यासाठी सुधाकर निर्मळे यांना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची निवड करून जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून त्यांचे अभिनंदन केले  जात आहे.   

No comments:

Post a Comment