![]() |
कलानिधीगडावर दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत मार्गदर्शक फलकाची उभारणी करण्यात आली. |
चंदगड / प्रतिनिधी
गेली दहा वर्षे महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील सीमावर्ती भागातील गड किल्यांवर संवर्धनाचे काम करीत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत कलानिधीगड (ता. चंदगड) येथे नकाशा फलकाची उभारणी नुकतीच करण्यात आली.
दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत कलानिधीगड (ता. चंदगड) येथे गेल्या तीन वर्षापासून गडसंवर्धनाचे काम सुरु आहे. दुर्गवीर स्वयंसेवकांमार्फत गडावरील तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक वास्तूंची सफाई तसेच डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झालेली आहे. या भेट देणाऱ्या गडप्रेमींना गडावरील सर्व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळण्यासाठी मार्गदर्शक नकाशा फलकाची आवश्यक होती. यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी फलक उभारण्यात आला. याप्रसंगी दुर्गवीरचे अजित पाटील, अनिल केसरकर, ऋषीकेश सुतार, विठ्ठल बामणे, महेश भेंडूलकर, राजु सुतार, विनायक होनगेकर, राजाराम पाटील, शैलेश भातकांडे, मंदार पाटील, संजय सुतार, स्वप्निल पाटील, अभिजित पाटील, पंकज पाटील, संदीप नाईक, राहूल कांबळे, बाबू रामनकट्टी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment