![]() |
वैष्णवी आनंद पाटील |
कोवाड (ता. चंदगड) येथील वैष्णवी आनंद पाटील हिने संजय रोडावत पॉलीटेक्निक कोल्हापूरमध्ये प्रथम वर्षात इलेक्ट्रॉनिक शाखेत 83.13 % गुण संपादन करून तृतीय क्रमांक मिळवला.
मागील वर्षी तीने इयत्ता 10 वी मध्ये 91.80 % गुण मिळवले होते. तीला प्राचार्य विराट गिरी, एच. ओ. डी. एस. एम. महाडिक, वर्ग शिक्षक एस. एम. जाधव, ए. यु. पाटील, एन. एस. पाटील, पायमल, तेली, कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामध्ये आपल्या कुटुंबियांचा मोठा वाटा असल्याचे तीन सांगितले. त्यात तिची आजी अंगणवाडी सेविका चंद्रभागा पाटील यांनि तिला वेळोवेळी मनोबल वाढवले. कोणत्याही क्षेत्रा मध्ये मुली कुठेच कमी पडत नाहीत हे वैष्णवीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे. तीच्या या दैदिप्यमान यशा बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment