चंदगड शहर शुद्ध पाण्यापासून वंचित, तहसीलदार यांच्याबरोबर शहरवासीयांची चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2019

चंदगड शहर शुद्ध पाण्यापासून वंचित, तहसीलदार यांच्याबरोबर शहरवासीयांची चर्चा

चंदगड नगरपंचायतीमध्ये पाणी प्रश्नाबाबत चर्चा करताना ग्रामस्थ व अधिकारी. 
अनिल धुपदाळे, चंदगड
नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवण्याची जबाबदारी गाव किंवा शहराच्या स्थानिक स्वराज्यसंस्थेवर असते. नागरिकांच्या सनदच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजा बरोबर शिक्षण,आरोग्य,संचार,या सारखे हक्क घटनेनुसार प्राप्त झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाणी हा घटक सर्वांसाठी महत्वाचा आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नागरिकांना पुरवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. यासाठी शासन कोटी रूपये खर्च करत असते. मात्र पाणी योजनाच जर व्यवस्थित कार्यान्वित झाली तर मग नागरिकांना स्वच्छ पाण्याची अपेक्षित कशी करावी? अशीच काहीशी परस्थिती चंदगड वासीयांच्या नशिबी आली आहे.  स्वच्छ पाणी राहूदे बाजुला आहे ते पाणी वेळेत मिळणे अवघड होत आहे. गेली कित्येक वर्ष मोटर बिघाडच तूनतून ऐकवल जात आहे. मोटर दुरूस्तीचाच खर्च किती झाला असेल याचा विचार न केलेला बरा. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असावा अशी लोकांतून चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच चंदगड शहरवासीयांपैकी कांहीनी तहसीलदार विनोद रणावरे यांची भेट घेवुन शहराला स्वच्छ पाणी मिळाला पाहिजे असा आग्रह केला. चंदगडला नगरपंचायतसाठी दर्जा अलीकडे मिळाला आहे. त्यामुळे सध्या नगरपंचायतचे काम तहसीलदार यांच्या अखत्यारीत आहे.
चंदगड शहराला गेली 8 वर्ष होत असलेल्या अशुद्ध व अपु-या  पाणी पुरवठ्या बाबत नगर पंचायत प्रशासक तहसीलदार विनोद रणावरे यांना गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्तानी निवेदन दिले होते. याची दखल घेत तहसीलदार यांनी बैठकीचे नियोजन चंदगड नगरपंचायत येथे केले होते. या वेळी चंदगडच्या जनतेने आपल्या व्यथा मांडली. या वेळी भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पिळणकर यांनी सन 2010 साली झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भोंगल  करभाराची व्यथा मांडली. गोरगरीब जनतेला या सुविधेपासुन कशा प्रकारे पाण्या पासुन वंचित ठेवल गेले हे तहसीलदार यांच्या समोर कथन केले.  या योजनेतील जुनी पाईपलाईन अंतग॔त (शहराअंतर्गत)  न बदलता ही योजना तसीच राबवली. त्या मुळे नागरिकांना कसा अपुरा पाणी पुरवठा होतो असे सांगितले. तसेच भाजपा शहर अध्यक्ष योगेश कुडतरकर यांनी लवकरात लवकर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा कसा केला जाईल. या बाबत माहिती दिली. यावेळी चंदगड मधील युवकांनी बरेचसे विषय   तहसीलदार रनावरे यांच्या समोर मांडले. तहसीलदार यांनी  तात्काळ याची दखल घेत सर्व पाणी पुरवठा विभागाची पाहणी करूण नियोजना बाबत चिंता व्यक्त केली. या योजनेतील ठेकेदाराला नोटिस काढण्याचे बजावले. तसेच पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना तात्काळ नियोजन करण्याचे बजावले. या वेळी माजी  जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, प्रदिप कडते, उमेश शेलार, अंनत हळदणकर,  मोहन पाटील, चेतन शेरेगार, महेश पिळणकर व चंदगड मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
अनिल धुपदाळे, चंदगड

No comments:

Post a Comment