चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत होणार गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2019

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत होणार गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत मराठी विषयात ८८ गुणांपेक्षा जास्त गुण पडलेल्या विधार्थ्याचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक, पालक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. संबधित विद्यार्थ्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली गुणपत्रिकेची झेराक्स प्रत व फोन नंबर २७ जून पर्यंत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन मराठी अध्यापक संघातर्फे करण्यात आले आहे. त्यानंतर आलेल्या गुणपत्रिकाचा विचार केला जाणार नाही. सर्व गुणपत्रिका जमा झाल्यावर अंतिम मेरीट लावण्यात येणार आहे.
चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार
मराठी विषयासाठी योगदान, विविध उपक्रम, साहित्य संमेलन सहभाग, संघटनेच्या कार्यशाळेतील सहभाग, साहित्य लेखन, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, संघटनेतील सक्रियता या सर्व गोष्टींचा विचार करून संघटनेमार्फत चंदगड तालुका प्रेरणा पुरस्कार तालुक्यातील मराठी अध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते दिला जातो. मराठी अध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त मराठी अध्यापकांचा सत्कार
मराठी विषयासाठी आपली संपूर्ण सेवा देणाऱ्या या वर्षीच्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सहपत्नीक मराठी अध्यापक संघामार्फत सत्कार करण्यात येणार आहे. मराठी विषय शिक्षकांनी आपल्या शाळेतील मराठी विषयात ८८ पेक्षा जास्त गुण असलेल्या गुणपत्रीका संजय साबळे (चंदगड), एच.एस. पाऊसकर (नागनवाडी), पी. के. पाटील (अडकूर), एम. एन. शिवणगेकर (डुक्करवाडी), बी. एन. पाटील (तुर्केवाडी), व्ही. एस. सुतार (तुडये) व एस. पी. पाटील (कोवाड) यांच्याकडे जमा कराव्यात असे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment