![]() |
योगाचे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थ्यी. |
चंदगड / प्रतिनिधी
तरूणांच्या उज्वल व सम्रुद्ध जीवणासाठी योगा अतिशय महत्त्वाचा तणावमुक्त, आरोग्यपुर्ण, तल्लख बुध्दीमत्तेसाठी अनुलोम, विलोभनीय सारख्या प्राणायाम प्रकार हा विद्यार्थी जीवनात फार मोठी भुमिका बजावून शकतो. अगदी सर्दी, पडसे ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला लपवून लावण्याची ताकत युगात आहे. सध्या जगातील बहुसंख्य देशात योग साधना केली जाते. जलनिती आणि सुत्रनितीचा अवलंब करून अवस्था, दमा इत्यादी व्याधीना योग हाकलू शकतो असे प्रतिपादन हल्कर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात "योग दिन"निमित्त प्रा.पी. ए.घोगडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलत होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना योगदिनाचे मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. के. एम. गोनुगडे होते. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. एम. व्ही. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रा. एन. एम. कुचेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment