अलबादेवी येथील पाणंदचे काम सहकार्यातून पूर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2019

अलबादेवी येथील पाणंदचे काम सहकार्यातून पूर्ण

अलबादेवी (ता. चंदगड) येथील पाणंदीने अखेर मोकळा श्वास घेतला. 
चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथील सुमारे   दोन हजार  मीटर  लांबीच्या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आज पूर्ण झाले. पाणंद मधून  गावातील जवळपास सत्तर टक्के लोक ये-जा करत असतात. या रस्त्यातून जाताना काच लागून गावातील चार लोक जखमी झाले होते. एका व्यक्तीची तर पायाची बोटे गमवावी लागली होती. या गोष्टीचा विचार करून गावातील श्रीकांत नेवगे व परशराम चौकुळकर यांनी हा विषय तंटामुक्त अध्यक्ष धोंडिबा घोळसे, सरपंच रेखा देवळी, उपसरपंच राजाराम पाडले यांच्याकडे लावून धरला होता.
या कामी  सर्वांची तयारीही होती. पण अडचण फक्त निधींचीच होती. या संदर्भात नेवगे यांनी पं. स. चे सभापती बबनराव देसाई, बांधकाम उपअभियंता श्री. जाधव,  सरपंच रेखा देवळे यांच्याशी निधी संदर्भात चर्चा करून या रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली. माजी सरपंच धोंडिबा घोळसे, उपसरपंच राजाराम पाडले यांच्याशी विशेष बाब म्हणून ग्रामपंचायत अतिरिक्त निधी इकडे वळवा असे मत व्यक्त केले. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून  प्रयत्न करून आज आठ ट्रॅकटर व एक जेसीबी च्या सहायाने "ठेक "नावाच्या परशराम कोंडीबा घोळसे यांच्या शेतातून दोन किलोमीटर अंतरावरून मुरूम आणून अखेर हे काम पूर्ण करत ग्रामस्थांना दिलासा दिला. या कामी ग्रामसेविका अश्विनी कुंभार, सुवर्णा वळवी,यशवंत घोळसे,परशराम  कोंडीबा घोळसे, सुधाकर कांबळे, अडकुर येथील सुभाष घोरपडे यांचे सहकार्य लाभले. या कामी सर्वानी सकारात्मक भुमिका घेतल्याबद्दल  श्रीकांत वावगे, धोंडिबा घोळसे व राजाराम पाडले यानी आभार मानले.


No comments:

Post a Comment