चंदगड / प्रतिनिधी
यापुढे होवू घातलेल्या सर्व प्रकारच्या निवडणुका या एव्हीएम मशिनएवजी पतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात. या मागणीचे निवेदन भारतीय बौध महासंघ शाखा चंदगड व वंचित बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे यांना दिले आहे.
निवेदनात असे म्हटलेआहे की, ``भारतीय लोकशाहीनुसार देशातील प्रत्येक निवडणुका मतपत्रिकेचा वापर करून घेण्यात आल्या आहेत. मात्र सद्या ईव्हीएमच्या माध्यमातून होत असलेल्या पद्धती बाबत देशात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकाच्या काही ठिकाणी झालेले मतदान व मशीनद्वारे आलेल्या संख्येतील फरक मतमोजणी वेळी पाहण्यास मिळाला. जगातील विकसनशील देशात ईव्हीएमच्या मशीनद्वारे मतदान घेतले जात नाही व ही पद्धत कालबाह्य झाली आहे. त्यामुळे आता आपल्या देशात होणाऱ्या सर्व निवडणुका मतपत्रिकेचा वापर करून होणे गरजेचे आहे असे निवेदणात म्हटले आहे. या निवेदनावर भारतीय बौध महासंघ शाखा चंदगड व वंचित बहुजन विकास आघाडी इत्यादी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment