चंदगड तालुका शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात सातव्या क्रमांकावर - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2019

चंदगड तालुका शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात सातव्या क्रमांकावर


चंदगड / प्रतिनिधी
राज्य शासनामार्फत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व माध्यमिक विभागात इयत्ता पाचवीचे 27 तर माध्यमिक विभागात आठवीचे 36 विद्यार्थ्यांनी यश मिळविले. दोन्ही विभागातून 63 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. जिल्ह्यात चंदगड तालुका सातव्या क्रमांकावर आहे. 
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे अशी इयत्ता पाचवी साईराज भादवणकर, राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक गणेश खन्नूरकर, विक्रांत पाटील, सुमेध माळकरी, संजना मसुरकर, आयान शेख, आशिष पवार, प्रशिल पालकर, श्रावण डोणकर, विकास पाटील, अथर्व गावडे, मंदार बिरजे, सप्तर्षी हेरवाडकर, संस्कार पाटील, साक्षी चव्हाण, अंकिता मयेकर, साक्षी शिंदे, साहिल इंजल, अभिजीत भोसले, आदित्य मुंडे, शुभम गावडे, गौतम घोळसे, जानवी पाटील, प्रथमेश गावडे, चिंतामणी पाटील, श्रेया पाटील,  ऐश्वर्या बुरूड. 
इयत्ता आठवी शंतनु बेनके, वैभव गुरव, मधुरा पाटील यांनी राज्य गुणवत्ता यादीत अनुक्रमे दुसरा, पाचवा व सहावा क्रमांक पटकावला. आदित्य पाटील, मेघा मातवंडकर, हर्षदा सुतार, प्रसाद देसाई, शुभम पाटील, प्रवीण चौगुले, श्रीधन प्रधान, सुरज पाटील, श्रीप्रसाद पाटील, समीक्षा पाटील, अश्विनी बोकडे, प्रणाली चव्हाण, स्नेहा पाटील, रामकृष्ण पाटील, श्रेयस पाटील, प्राची मयेकर, मारुती पाटील, समृद्धी तरवाळ, सौरभ पाटील, शिवानी यमेटकर, अनिकेत गावडे, ज्ञानेश्वर शिरूर. गटविकास अधिकारी रमेश जोशी व गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment