चंदगड तालुक्यात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2019

चंदगड तालुक्यात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी


चंदगड / प्रतिनिधी
शहरासह परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून-मधून सुर्यकिरणांचे दर्शन होत आहे. दुपारी मात्र अचानक वातावरणामध्ये बदल झाल्याने दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी पडतच होत्या. आज सकाळी झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 0.66 तर आतापर्यंत 126.33 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. झालेल्या चोवीस तासात चंदगड व हेरे येथे प्रत्येकी 2 मिलीमीटर तर अन्य नागणवाडी, माणगाव, कोवाड, तुर्केवाडी या सर्कलमध्ये पाऊस पडला नाही. सद्या सर्वत्र पेरणीची धांदल सुरु आहे. बळीराजाने धुळवाफ पेरणी करुन मान्सुनची पावसाची वाट पहात आहे. सद्या भुईमूग पेरणीचे काम जोरात सुरु आहे. सद्या रताळी लागवडीसाठी शेत तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बांधकाम करणाऱ्या मंडळीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. अद्याप मान्सून सुरु न झाल्याने दिवसातून कधी-कधी पाऊस पडत असल्याने बांधकाम करणाऱ्या सर्वांनाच तो फायद्याचा ठरत आहे. 

No comments:

Post a Comment