चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकासह जागतिक योग दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2019

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकासह जागतिक योग दिन साजरा

हलकर्णी (ता. चंदगड) येथे योगदिनानिमित्त प्रात्यक्षिके करताना विद्यार्थीवर्ग.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक योग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, मंदिरे यासह अन्य ठिकाणीही योगाची प्रात्यक्षिके दाखवून धावत्या जीवनातील योगाचे महत्व समजून सांगण्यात आले. 
चंदगड पोलीस ठाणेस वतीने योगादिनानिमित्त नवीन प्रशासकीय ईमारतीमध्ये योगाची प्रात्यक्षिके कऱण्यात आली.
चंदगड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने योगादिनानिमित्त नवीन प्रशासकीय ईमारत चंदगड येथे चंदगड पोलीस ठाणे कडील अधिकारी व कर्मचारी, न्यु इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी, भगतसिंग करीअर ॲकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी मुले, मुली व शिक्षक असे योग गुरु विजय अमृसकर यांचे मार्गदर्शनाखाली योगा कार्यक्रम संपन्न झाला. चंदगड येथील श्री रवळनाथ देवालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये एस. के. ग्रुपच्या वतीनेही योगदिनानिमित्त संजय काणेकर यांनी योगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिके सादर केली. एस. के. ग्रुपचे सुनिल काणेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चंदगड येथे एस. के. ग्रुपच्या वतीने  योगदिनानिमित्त प्रात्यक्षिके करताना विद्यार्थीवर्ग.
बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगा, प्राणायामावर भर द्यावा,तसेच  ध्यान, धारणेला प्राधान्यक्रम द्यावा आणि सध्याच्या वेगवान युगात  तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित योगासने करावी असे मत योग शिक्षक संजय काणेकर यांनी व्यक्त केले. ते जागतिक योग दिना निमित्त एस के ग्रुपच्या वतीने  शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या योग कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यशाळेसाठी कुमार व कन्या विद्या मंदिर तसेच रवळनाथ हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचा उद्देश सुनिल काणेकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्राणायाम आणि  सुलभ योगासनांची ओळख करून त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री मांगले, श्री देसाई, रंजना चंदगडकर, सरोज गोरुले, रमेश कुंभार, मारुती शहापुरकर, श्रीकांत सावंत, विनायक प्रधान, संतोष घवाळे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॉबी बल्लाळ, बबलू जूवळी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नागोजी गावडे यांनी केले तर आभार श्रीकांत सावंत यांनी मानले.
केंद्र शाळा कोवाड येथे योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके करताना शिक्षक व विद्यार्थी 
                              कोवाड केंद्रांतर्गत शाळांमध्ये जागतिक योग दिनाचा उत्साह
कालकुंद्री / प्रतिनिधी
यासह कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत पाचव्या जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचा उत्साह होता. केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड सह केंद्रातील किणी, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी, निटूर, घुलेवाडी, मलतवाडी, जकनहट्टी या शाळांत योगाचे महत्त्व व गरज सांगण्यासह प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये ४५ शिक्षक व ९६१ विद्यार्थी सहभागी झाले होते. कोवाड येथील कार्यक्रमात केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी योग अभ्यासाचा पुराण व वैदिक काळापासूनचा इतिहास  त्याचे महत्त्व, गरज व नियमित योग प्राणायामचे फायदे विषद केले. 
तेऊरवाडी शाळेत योग प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थी
अध्यापक गणपत लोहार व श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. यात उज्वला नेसरकर, भावना आतवाडकर, कविता पाटील, मधुमती गावस, लता सुरंगे आदींसह सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी केंद्रप्रमुख वाय. आर. निटूरकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.



No comments:

Post a Comment