सुंडीत नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने झांजपथक व शालेय साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2019

सुंडीत नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने झांजपथक व शालेय साहित्याचे वाटप

सुंडी (ता. चंदगड) येथील नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शिवगर्जना झांज पथकच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना झांज पथक साहित्य, बूट व शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
सुंडी (ता. चंदगड) येथील नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शिवगर्जना झांज पथक च्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना झांज पथक साहित्य, बूट व शालेय दप्तरांचे वितरण मंडळाच्या वतीने  करण्यात आले.
समाजप्रबोधन व शैक्षणिक क्षेत्रासाठी गेली 30 वषेॅ गणेशोत्सवाच्या माध्यमातून या मंडळाने  सामाजिक बांधिलकी जपली आहे .मराठी विद्या मंदीर सुंडी शाळेसाठी  एल.ई.डी. टी.व्ही,.किचन शेगडी2 नग व  सुंडी येथील  हायस्कूल साठी  सुद्धा वेळोवेळी मदत केली आहे. आजच्या कायॆक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  वैजनाथ पाटील, पुंडलिक गुरव,संतोष देवळी व बेबी कदम  यांच्या उपस्थितीत वितरण सोहळा पार पडला.शाळेच्या वतीने मंडळाचे त्यानी विशेष आभार व्यक्त करून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचे आवाहन केले. झांज पथकाचे साहित्य हे योगेश हन्नुरकर (विस्तार अधिकारी मुंबई )संजय पाटील (मु.वाघोत्रे शाळा) अवधूत भोसले(अध्यापक चंदगड ) विष्णू मोयॆ (क्लाकॅ मिलिट्री ) व एन.एम.पाटील (चेअरमन जय जवान पत संस्था )यांच्या मार्फत व कोनेरी पाटील, कल्लापा ढोकरे यांच्याकडून किटस्, मारूती मोयेॅ, वैजनाथ पाटील व नवयुवक मंडळाच्या सवॆ कायॆकत्याॅच्या श्रमदानातून साहित्य व झांज पथक  देण्यात आले. यावेळी उपस्थित पालकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment