पारगड (ता. चंदगड) येथे शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त जमलेले शिवभक्त. |
नंदकुमार ढेरे, चंदगड
मजरे कारवे येथील शहिद जवान वेलफेअर फौडेंशन, पारगड ग्रामस्थ व शिवप्रेमी यांच्या सयुक्त विद्यमाने किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवराज्यभिषेक दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे विधीवत पुजन करुन अभिषेक घालण्यात आला.
शिवराज्यभिषेक सोहळ्यावेली मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविताना सर्वोदय संस्थेच्या रणरागिनी. |
खासदार सभांजीराजे यांच्या प्रयत्नातुन रायगडवर होत असलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्याने प्रेरित होऊन चंदगड वासीयांनी शिवराज्यभिषेक दिन सोहळा शिवाजी महांराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगडवर साजरा करण्यात आला. दरम्यान ५ मे रोजी पारगडवर स्वच्छता मोहीम राबिण्यात आली.
पालखी मिरवणुक |
कोल्हापूर येथील लखन जाधव यांच्या मावळयांनी सादर केलेले युद्धकलांचे प्रात्याक्षिक बघुन उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फिटले. मशाल फेरी काढून पोवाडे व गोंधळ गिते सादर करण्यात आली. ६ मे रोजी सकाळी पहाटे ५: ३० वाजता काकड आरती व ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवराज्यभिषेक सोहळा |
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे यावेळी पुजन करुण अभिषेक घालण्यात आला. भवानी मातेच्या मंदिरात पुजारी अशोक जोशी याच्या हस्ते शस्त्र पुजा करुण भडांरा उधळण करण्यात आला. यावेळी किल्ले गंधर्वगड व महिपाळगड येथून आलेल्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. मावळ्यांनी परीधान केलेले भगवे फेटे, टोप्यांमुळे व महिलांनीही भगव्या साड्या व टोप्या परिधान केल्याने अवघा पारगड भगवामय झाला होता.
भंडाऱ्याची उधळण करताना शिवभक्त. |
त्यानतंर पालख्यांसह गडावर मिरवणुक काढण्यात आली. यानंतर मुख्य शिवराज्यभिषेक सोहळा मंत्र घोषात पार पडला. यावेळी हजारो शिवभकत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी संपुर्ण पारगड दणाणून गेला.
शंख वाजविताना पराग निट्टूरकर |
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चंदगड. आजरा, गडहिग्लज, बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग येथील शिवप्रेमीनीं उपस्थिती लावली होती.
शिवराज्यभिषेक सोहळ्यातील क्षण |
या सोहळ्याला आमदार संध्यादेवी कुपेकर, तालुका सघांचे अध्यक्ष राजेश पाटील, गोपाळराव पाटील, संग्राम कुपेकर, सभापती बबन देसाई, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, अरुण सुतार, पारगड जनकल्याण संस्थेचे कान्होबा माळवे, वसंत नांगंरे, शांताराम आढाव, तटांमुक्त अध्यक्ष रघुवीर शेलार, सरपंच प्रकाश कदम, विलास आढाव, प्रकाश चिरमुरे, पाडुरंग बेनके, राजा बेरडे, मानु जांभळे, राघोबा शिंदे, सरपंच शिवाजी तुपारे, पराग निट्टूरकर, दिलिप कदम, सुरज हारकारे, विनायक गडकरी, अशोक हारकारे, विष्णू कार्वेकर, देवाप्पा बोकडे, नारायण गडकरी आदिसह हजारो शिवभक्त उपस्थित होते. आभार उपसरपंच निवृत्ती हारकारे यांनी मानले.
सोहळ्याला उपस्थित शिवप्रेमी जनता. |
गुरुप्रसाद माने यांची हलगी शिवभक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरली. शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये लखन जाधव यांच्या टीमचा ढालपट्ट्याबरोबरच गुरुप्रसाद माने यांची हलगी शिवभक्तांच्या अंगात वीरश्री संचारणारी ठरली. काल रात्री (ता. 5) पोवाडे, गोंधळगीते व हलगीच्या ठेक्यावर रात्र जागवली. अभिजित पाटणे यांनी रात्रभर सुरेख भजने सादर केली. तर या सोहळ्यासाठी आप्पासाहेब रेवडे यांनी जिल्ह्यातील सात नद्यांसह अरबी समुद्रातील जल अभिषेकासाठी आणले होते.
No comments:
Post a Comment