![]() |
चंदगड येथे वन आणि वन्यजीव जीवन संरक्षण विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एम. माराको. समोर उपस्थित वन आणि पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी. |
चंदगड / प्रतिनिधी
आपला देश संपूर्ण आशिया खंडात जैव विविधतेने नटलेला आहे. आजच्या युगात जैव विविधतेला खूप महत्व आहे. मात्र माणूस आपल्या स्वार्थासाठी जैव विविधतेमधील विविध घटनांचा वापर करून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करत आहे. देशातील कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओरीसा इत्यादी कित्येक राज्यातील वन घटक आणि वन्यजीवाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी वन विभाग आणि पोलिस विभाग कार्यरत आहे. मात्र प्रत्येकाने वन आणि वन्य जीवाच्या रक्षणासाठी झटणे आणि पर्यावरण रक्षण करणे काळाची गरज आहे. यासाठी भारतात वन आणि वन्यजीव संरक्षण कायदा (1972) अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक काम करूया असे कार्यशाळेतील सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना एम. माराको (रिजनल डेप्युटी डायरेक्टर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, मुंबई) यांनी सांगितले. राज्य सरकारच्या विद्यमानाने वन विभाग व पोलीस विभाग परिक्षेत्र अखत्यारीत चंदगड येथील वन विभाग आणि चंदगड पोलीस ठाणे यांची कार्यशाळा तहसीलदार कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
![]() |
कार्यक्रमाला उपस्थित पोलिस व वन अधिकारी-कर्मचारी. |
कार्यक्रमा दरम्यान वन्यजीव तस्करीवर आधारित स्लाईडशो दाखवून तस्करी रोखण्यासाठी आवाहन केले. यावेळी तस्करी रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न व सामुदायिक जबाबदारीवरीचे महत्व सांगण्यात आले. तसेच यावेळी जैवविवीधतेतील कोणकोणत्या घटकाची तस्करी कशासाठी व कोणकोणत्या भागातून विशेषत: होते. हे सांगून ते रोखण्यासाठी केल्या जाणा-या प्रयत्नांची माहिती सविस्तरपणे सांगितली.
इन्प्सेक्टर वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल मुंबईचे राकेश बर्मन, वनजीव रक्षक कोल्हापुरचे रमन कुलकर्णी तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापुर वन परीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेचे उपस्थित होते. त्याचबरोबर गडहिंग्लज विभागातीलही पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. स्वागत पोलिस निरीक्षक शिवप्रसाद यादव यांनी केले. आभार पो. स. ई. श्री. कदम यांनी मानले.
No comments:
Post a Comment