ट्रॅक्टर ट्रेलरखाली सापडून वाळकोळीचे नाना घोटणे यांचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2019

ट्रॅक्टर ट्रेलरखाली सापडून वाळकोळीचे नाना घोटणे यांचा मृत्यू

नाना घोटाणे

चंदगड / प्रतिनिधी
ट्रॅक्टर ट्रेलर घेवून शेताकडे जात असताना ट्रॅक्टर ट्रेलर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. नाना झिलू घोटणे (वय-58, रा. वाळकोळी, ता. चंदगड) असे मयताचे नाव आहे. नाना घोटणे हे ट्रॅक्टर ट्रेलर घेवून आपल्या शेताकडे जात होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ पाटील यांचे घरासमोरील रोडवर आले असता ट्रॅक्टर ट्रेलर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यामध्ये नाना घोटणे हे उंचवट्याच्या खाली असलेल्या झाडाच्या खाली पडले. यावेळी पलटी झालेले ट्रॅक्टर ट्रेलर त्यांच्या डोक्यावर व मानेवर पडल्याने नाकातोंडातून रक्त येवून ते जागीच गतप्राण झाले. ट्रॅक्टर ट्रेलर पलटी झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरीकांनी त्यांच्या अंगावर पडलेले ट्रॅक्टर ट्रेलर  काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वजन जास्त असल्याने नागरीकांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर ट्रेलर ओढून बाजूला केला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. नाना घोटणे हे गव्हमेंट ठेकेदार होते. 


No comments:

Post a Comment