चंदगड तालुक्यातील पिळणी येथे 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2019

चंदगड तालुक्यातील पिळणी येथे 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

पिळणी (ता. चंदगड) येथे वनविभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रमात वृक्षारोपन करताना पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
हरित महाराष्ट्र संकल्पनेतून या वर्षी राज्यात 33  कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत चंदगड तालुक्यात यावर्षी वन विभाग चंदगड कडून दोन लक्ष रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ पिळणी (ता. चंदगड) येथे वृक्षलागवड करुन करण्यात आला. 
चंदगड तालुक्यातील वृक्षलागवडीच्या मोहिमेची सुरुवात मौजे पिळणी येथे वन विभाग चंदगडच्या वनस्थळी 1 जुलै 2019  रोजी वृक्षारोपण करून करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिळणीचे आणि शिक्षक वर्गाने सहभाग घेऊन वृक्षारोपन केले. वृक्षारोपण कार्यक्रमाला लोकचळवळ करण्याचे पण जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखावा. हरित महाराष्ट्र करण्यात प्रत्येकाने योगदान देण्यासाठी सर्व नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याबाबत प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी तहसीलदार विनोद रणावरे, सभापती बबनराव देसाई, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल गावडे, चंदगडचे वनक्षेत्रपाल ज्ञा. गो. राक्षे, वनपाल डी. जी. पाटील, बी. आर. निकम, वनरक्षक चंद्रकांत पावसकर यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment