![]() |
चन्नेटी शाळेत विद्यार्थ्यांना पाट्या व लेखन साहित्य वाटप करताना केंद्रप्रमुख डी.आय.पाटील. सोबत सर्व मुख्याध्यापक. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
कुदनुर (ता. चंदगड) केंद्राचे केंद्रप्रमुख डी.आय.पाटील यानी आपल्या वाढदिवसा निमित्त केंद्रातील नडगट्टे, यर्तेनहट्टी, तिरमाळ, चनेट्टी, खनेट्टी व तळगुळी या शाळांंतील पहिलीच्या सर्व विध्यार्थीना पाटी व लेखन साहित्याचे वाटप केले. प्रसिध्दीपासून दुर राहुन सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी आपला वाढदिवस केंद्रातील शाळेतील मुलांना विविध साहित्य देऊन साजरे करतात. केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांनी चन्नेटी या शाळेमध्ये वाढदिवस साजरा केला. चन्नेटीसह वरील सर्व शाळा बहुतांश कन्नड भाषिक आहेत. अशा शाळांतील मुलांची गुणवत्ता सुधारावी यासाठी पाटील यांनी ऊपक्रम राबऊन तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी चनेटी शा. व्य. समिती अध्यक्ष राजेंद्र खातेदार, सदस्य कलापा दवलति, धोंडिबा पाटील आदी ग्रामस्थ व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक हजर होते. यावेळी सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रल्हाद गावडे यांनी केले व आभार शंकर कोरी यांनी मानले.
No comments:
Post a Comment