चंदगड तालुक्यात सकाळी उघडीप दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2019

चंदगड तालुक्यात सकाळी उघडीप दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी


चंदगड / प्रतिनिधी
शहर परिसरात आज सकाळपासून पावसाने उघडीत दिली. मात्र दुपारनंतर अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 14.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मौजे तळगुळी (ता. चंदगड) येथील दुंडू कांबळे यांच्या घराची भिंत पडून अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काल दिवसभरात सर्वांधिक 32 तर सर्वात कमी कोवाड परिसरात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे शेतीकामे खोळंबली आहेत. बळीराजा रोपलावणीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत तर काही शेतकरी विहीर, ओहोळ व नदी या सोयीनुसार कृत्रिम पध्दतीने पाण्याची सोय करुन रोपलावण करत असल्याचे चित्र सद्या शिवारात दिसत आहे. 


No comments:

Post a Comment