![]() |
गोपाळराव पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका हा दुर्गम व डोंगराळ आहे. त्यामुळे येथे दळणवळणाच्या
सुविधा अपुऱ्या असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होती. इतर तालुक्याच्या तुलनेत
तालुक्याचा विकास झालेला आहे. तालुक्याच्या सर्वागिण विकास करण्यासाठी पालकमंत्री
तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकादादा पाटील यांच्या माध्यमातून चंदगड
तालुक्यात सद्या 45 कोटी 75 लाखांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. हि माहीती
भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. अतिपावसामुळे रस्ते खराब होवून दळणवळणाचा मोठ्या
प्रश्न उद्दभवत होता. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होती होती. ही गैरसोय दुर करुन
वाड्या-वस्त्यांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी रस्ते, मोरी बांधकाम
यासारख्या कामांसाठी तालुक्याला भरघोस निधी देण्याची मागणी मंत्री चंद्रकांतदादा
पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे मंत्री श्री. पाटील यांनी 45 कोटी 75
लाखांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. यातील काही कामांची टेंडरप्रक्रिया पुर्ण
झाली असून उर्वरीत कामांची टेंडरप्रक्रिया करण्याचे काम सुरु असून पावसाळ्यानंतर
कामांना प्रत्यक्ष सुरवात होईल.
रस्ते सुधारणा करण्यासाठी 36 कोटी 75 लाख, मोरी बांधकामासाठी 1 कोटी
26 लाख, नवीन रस्त्यांच्या जोडणीसाठी 6 कोटी 99 लाखांचा निधी मंजुर झाला आहे.
कोळीद्रे-श्रीपादवाडी-नागवे-हेरे रस्त्यासाठी 40 लाख, कागणी-कल्याणपूरसाठी 20 लाख,
गणेशवाडी ते कर्नाटक हद्द 20 लाख 91 हजार, ढेकोळी बु. ते ढेकोळी खुर्द खडीकरण,
डांबरीकरण व मोरी बांधकामासाठी 75.65 लाख, बिजूर-रायाचीवाडी-भोगोली
खडकरीण-डांबरीकरणसाठी 61 लाख 35 हजार या पाच कामांच्या निविदा निघालेल्या आहेत.
उर्वरीत कामांच्या निविदा टप्याटप्याने निघणार आहेत. बेळगाव-वेगुर्ला रस्त्याच्या
देखभाल दुरुस्तीसाठी 5 कोटी, इब्राहिमपूर ते आजरा रस्त्यासाठी 81 लाख व मोटणवाडी
ते मिरवेल रस्त्यासाठी 65 लाख 34 हजार रुपयांची निधी उपलब्ध करुन दिला आहे. चंदगड
तालुक्यात पर्जन्यमान जास्त असल्याने
विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांतदादा
पाटील यांनी गोपाळराव पाटील यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेवेळी मल्लीकार्जून
मुगेरी, पंचायत समिती सदस्य ॲड. अनंत कांबळे, विशाल पाटील, अशोक जाधव,
संजय पाटील, शरद मटकर, अंकुश पाटील, सुनिल काणेकर, ॲड. विजय कडुकर
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment