![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलतच्या साखरेबाबत नायब तहसीलदार डी. एम. नांगरे याना निवेदन देताना प्रा. एन एस पाटील, ॲड. संतोष मळवीकर, सुरेशराव चव्हाण-पाटील, एम. एन. पाटील, प्रा. एच. के. गावडे व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा बॅंकेने सन 2016-17 सालात हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या साखरेला कर्ज देऊन ती साखर तारण घेतली आहे. या तारण साखरेची विक्री शेतकऱ्यांची थकित बीले दिल्यानंतरच करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या देय असलेल्या थकित बिलाची रक्कम निश्चित करून त्यानुसार बिले आदा करावयाची रक्कम सरकारकडे शिल्लक ठेवावी व नंतरच गोदामातील शिल्लक साखर विक्रीस काढावी. तसे न झाल्यास याला शेतकरी व कामगार तीव्र विरोध करतील. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी तहसिल कार्यालयावर राहिल अशा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर प्रा. एन. एस. पाटील, ॲड. संतोष मळवीकर, सुरेशराव चव्हाण-पाटील, एम. एन. पाटील, प्रा. एच. के. गावडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment