कचरा ही जागतिक आपत्कालीन समस्या, गडहिंग्लज येथे 'आता कचरा नाही ' प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2019

कचरा ही जागतिक आपत्कालीन समस्या, गडहिंग्लज येथे 'आता कचरा नाही ' प्रशिक्षण

गडहिंग्लज येथे संपन्न झालेल्या आता कचरा नाही प्रशिक्षणात सामील झालेले शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे तज्ञ मार्गदर्शक.
कालकुंद्री / प्रतिनिधी
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या  शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित आता कचरा नाही हे जिल्हास्तरीय प्रशिक्षण गडहिंग्लज येथील  एम आर हायस्कूल येथे नुकतेच संपन्न झाले . यात  चंदगड ,आजरा, गडहिंग्लज, भुदरगड  या चार तालुक्यातील शिक्षण विस्ताराधिकारी  ,सर्व केंद्रप्रमुख  व प्रत्येक केंद्रातील  एक शिक्षक यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
कचरा ही एक घर गाव किंवा तालुक्या पुरती मर्यादित समस्या राहिली नसून ती आंतरराष्ट्रीय आपत्कालीन समस्या बनली आहे .कचरा व्यवस्थापन व कचऱ्याचे वर्गीकरण विद्यार्थिदशेपासून झाले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूरने जिल्हा परिषद शाळेत 'आत्ता कचरा नाही' हा नाविन्यपूर्ण उपक्रम आणला असून इयत्ता चौथी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे. विद्यार्थीदशेत झालेले संस्कार चिरकाल टिकतात हे ओळखून  हा उपक्रम राबविला जात आहे .नजीकच्या काळात  जि प च्या शाळातील शिक्षकांना तालुकास्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. कचऱ्याची समस्या आणि वर्गीकरण ,डम्पिंग ग्राउंड कंपोस्टिंग सशक्तिकरण, रिड्युस-रियुज-रिसायकल  असे चार भाग आहेत .एकूण  सोळा भागात सोळा आठवड्यांचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. शाळा स्तरावरील प्रशिक्षणात समुद्र प्रदूषण, कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा डेपोमुळे उद्भवणाऱ्या समस्या,  विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, कचरा न फेकता त्याचे आयुष्य वाढवणे ,कंपोस्ट खत परिचय व महत्त्व ,कचऱ्यामुळे जीवनात घडलेल्या बदलांचा गोष्टी, पुनर्वापर, कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांची कर्तव्ये, कचऱ्याचे प्रकार इलेक्ट्रॉनिक कचरा, घातक कचरा, कोरडा कचरा  ,सेंद्रिय कचरा इत्यादी माहिती जिल्हास्तरीय प्रशिक्षणात देण्यात आली. हिंदुस्तान युनीलिव्हर चे तज्ञ  सान्या चावला ,शुभा किशोर ,प्रथमेश ऐतवडे , सौ चार्ली ,निरव व सीमा यांनी सखोल मार्गदर्शन केले .यावेळी जि प शिक्षण विस्ताराधिकारी जयश्री जाधव, गटशिक्षणाधिकारी आर आर कोरवी ,यांनी उत्कृष्ट नियोजन केले. त्यांना  मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

No comments:

Post a Comment