किणी येथील परिवर्तन संस्थेकडून 'भारतीय संविधान' चे मोफत वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2019

किणी येथील परिवर्तन संस्थेकडून 'भारतीय संविधान' चे मोफत वाटप

भारतीय संविधानाची प्रत श्रीकांत पाटील यांचेकडे देताना संदिप गणाचारी.
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
किणी (ता. चंदगड) येथील परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून 'संविधान जागृती अभियान' राबविले जात आहे .  या  उपक्रमाअंतर्गत चंदगड तालुक्यातील शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज अडकूर  येथे  'भारतीय संविधान'  मोफत देण्यात आले. यावेळी परिवर्तनचे व्यवस्थापक संदिप गणाचारी यांच्या हस्ते  प्र. मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्याकडे संविधानाची प्रत दिली .यावेळी रणजित गणाचारी, एस . के .हरेर, सी .डी. जोशी , पी .के. पाटील , एस .के. पाटील , अजित गाणाचारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment