बायोमेट्रीक सिस्टीम बसविण्याच्या निर्णयासह सरपंच संघटनेच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2019

बायोमेट्रीक सिस्टीम बसविण्याच्या निर्णयासह सरपंच संघटनेच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा


सरपंच संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांना मागण्यांचे निवेदन देताना सरपंच.
चंदगड  / प्रतिनिधी
अखिल भारतीय सरपंच परिषद अंतर्गत चंदगड तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांची  बैठक पंचायत समिती चंदगड येथे संपन्न झाली. या बैठकीत ग्रामपमंचायतीच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे होते.
सरपंच प्रा. रमेश भोसलॆ यानी प्रास्ताविक व स्वागत केले. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यास आली. गडहिंग्लल  येथे  शुक्रवार (ता. 19) रोजी बचत  भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या चंदगड,  आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य  अधिवेशनाला  सर्वांनी  उपस्थित  राहणे, शिर्डी  येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय सरपंच परिषद अंतर्गत महाराष्ट्र  सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे, ग्रामप्रशासनात सुधारणा करणे. ग्रामप्रशासन  सुधारण्यासाठी  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमार्फत बायोमेट्रीक हजेरी चालू करणे व गावातील सर्व शासकीय नोकरांना ती लागु करणे, शासनाच्या, ग्रामप्रशासन परिवर्तन धोरणाना अनुकूल वातावरण तयार करणे, गटातटाचे  राजकारण न करता सरपंच यानी सर्व ग्रामस्थांना समान वागणूक देणे, गावचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, सरपंच व सदस्यांनी अधिवेशनाला  उपस्थित राहावे. महाराष्ट्रातील आदर्श  सरपंचाच्या अनुभव व मार्गदर्शन घेऊन शासनाने शेतकरी बांधव, कामगार, महिला व तरुणांना जाहीर केलेल्या योजनांची माहिती द्यावी, सरपंच व सदस्य   यांनी आपापल्या गावच्या विकासासाठी नवीन दिशा देण्यासाठी सहविचाराने जनहितासाठी प्रयत्न  करावेत. आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. 
चंदगड पंचायत समिती सभागृहात सरपंच संघटनेच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष रामभाऊ पारसे. उपस्थित सरपंच.
सरपंचाच्या  अडचणी समजावून त्या सोडवणे हीच माझी भूमिका आहे. आपणास जनतेसमोर अनेक प्रश्न व समस्या समजून काम करावे लागते. प्रशासकीय कामातील अडथळे आपल्याला येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन असे आवाहन सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. पारसे यांनी सांगितले.  बायोमेट्रीक हजेरी चालू करणे साठी केलेली सुचना अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी दिले. यावेळी सरपंच संघटनेच्या वतीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सरपंच डी. जी. नाईक, सरपंच एकनाथ कांबळे, सरपंच सौ. माधुरी  भोसलॆ, सरपंच सौ. स्वप्नाली गवस, सरपंच श्री. गावडे-पाटील, सरपंच शिवाजी तुपारे यांनी  मनोगते व्यक्त केली. ॲड. संतोष मळवीकर यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment