![]() |
तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील बसस्टॉपवर चरीमध्ये अडकलेला टँकर . |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
हेमरस कारखान्याकडून जयगडकडे मोल्यासिस घेऊन जाणारा टॅंकर तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील बसस्टॉपच्या वळणावर केबल टाकण्यासाठी खोदलेल्या चरीमध्ये रुतल्याने एका बाजुला कलंडला. चरीमध्ये भुसभुशीत माती असल्याने व या मातीत पावसाचे पाणी शिरल्याने हा संपुर्ण भाग मऊ झाला आहे. टँकरच्या वचनाने हळूहळू हा टँकर जमिनित एका बाजूने कलंडत असल्याचे पाहून ग्रामस्थानी लाकडी तरपांचा आधार दिल्याने मोठा अनर्थ टळला. या टँकरमध्ये जवळपास तीस टन मोलॅसिस असल्याने रुतलेला टँकर बाहेर काढणे अशक्य झाले. त्यामुळे आज दुसरे दोन टॅँकर मागवून अपघातग्रस्त टॅंकरमधील मोल्यासिस मोटरच्या साह्याने दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. हा अपघात अगदी वळणावर झाल्याने वाहतूकीची मोठी कोंडी झाली. घटनास्थळी ग्रामस्थानी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा हा टँकर बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
No comments:
Post a Comment