हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत संचलित अथर्व इंटरट्रेड कोल्हापूर या कारखान्याच्या गळीत हंगामासाठी 2019-20 साठी मिल रोलर पूजन अथर्व कंपनीचे मानसिंगराव खोराटे यांच्या आई-वडीलांच्या हस्ते करण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड कोल्हापूर लिस्ट युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हलकर्णी या कारखान्याच्या गळीत हंगाम 2019-20 साठी मिल रोलर पूजन अथर्व कंपनीचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांचे वडील गणपती खोराटे व मातोश्री सौ कमलाबाई गणपती खोराटे यांचे शुभ हस्ते आज सकाळी 11 वाजता घरगुती पद्धतीने संपन्न झाले.
गेली आठ वर्षे बंद असलेला दौलत कारखाना कोल्हापूर जिल्हा बँकेने अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांना 39 वर्षे लिज कराराच्या मुदतीने चालविण्यास दिला आहे. बऱ्याच वर्षानंतर बंद असलेल्या कारखान्यात रोलर पूजन झाल्यामुळे कामगार, शेतकरी, तोडणी वाहतूक यंत्रणेचे कंत्राटदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रम प्रसंगी अथर्व कंपनीचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी सन 2019-20 गळीत हंगामात 6.50 लाख मेट्रीक टन गळीत उद्दिष्टाचा संकल्प जाहीर केला. कारखाना कार्यक्षेत्रातून किमान 5.50 लाख मेट्रीक टन सर्व कामगार बंधू उपलब्ध करून देतील असा विश्वास व्यक्त केला. तुम्ही फक्त कामगार नसून शेतकरीसुद्धा आहात. गणिताचे उद्दिष्ट गाठण्यात आपण कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी चंदगड पंचायत समिती सभापती बबनराव देसाई, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चिटणीस, कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर, सेक्रेटरी रणधीर चव्हाण, चीफ इंजिनियर श्री. वनकुद्रे, चीफ केमिस्ट श्री. माने, मुख्य शेती अधिकारी पी. जी. पाटील, डिस्टिलरी इन्चार्ज, एल ओ ऑफिसर, स्टोर कीपर, डे चीफ अकाऊंटन्ट, शेती अधिकारी श्री. पाचापुरे, सिक्युरिटी ऑफिसर श्री. मस्के, युनियन अध्यक्ष प्रदीप पवार, सुरेश भातकांडे, अनिल होडगे, सुधाकर पवार, राजेंद्र पावसकर, अशोक तांबोळकर तसेच कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार कामगार, युनियन, पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment