चंदगड / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत 18 वर्षावरील नविन मतदारांची नाव नोंदणी, मयत मतदारांची व स्थलांतरीत मतदारांची यादीतून नाव कमी करण्याचे विशेष मोहिम कार्यक्रम दिनांक 20 व 21 जुलै हा दिवस चंदगड तालुक्यात राबविण्यात आला. मात्र ग्रामीण भागातून या मोहिमेला शेतीच्या हंगामामुळे कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी चंदगड तालुक्यात विशेष मोहीम कार्यक्रम म्हणून दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी राबवण्यात आला .शहरी भागातील सुट्ट्यांचा दिवस म्हणून हा दिवस जरी मोहिमेसाठी राबवण्यात आला असला तरी ग्रामीण भागात सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू असल्याने बहुतांशी नवीन मतदारांनी या मोहिमेकडे पाठ फिरवली. 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात यावी व मतदार यादीतील मतदारांच्या नांवात ,फोटोत ,लिंग व वयाबाबत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले .नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बऱ्यापैकी नविन मतदारांची नोंदणी झाली असल्याने क्वचितच नविन मतदार मतदार यादीत नांव नोंदवणे शिल्लक आहेत .या नविन मतदारांना आगामी विधान सभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी व मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली .ग्रामीण भागात सध्या शेतीचा हंगाम असल्याने बहुतांश शेतकरी व तरुण वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात विशेष असा एक दिवस पाळक दिवशी पाळला जातो.या दिवशी केंद्रस्तरावर निवडलेल्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम या दिवशी राबवली तर हा कार्यक्रम निश्चित शंभर टक्के यशस्वी होईल असे कार्यस्थळावर काम करणाऱ्या अधिकारी व ग्रामस्थांतून बोलले जात आहे.आज दिवसभरात संपुर्ण चंदगड तालुक्यातुन 113 नवीन मतदारांनी आपली नोंद केली.26 मतदारांची नावे वगळण्यात आली.23 मतदारानी मतदार यादीत दुरुस्ती नोंदवली तर एक मतदार स्थलातरीत झाला आहे.
No comments:
Post a Comment