चंदगड तालुक्यात पावसाची उसंत, रोपलावणी खोळंबली - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2019

चंदगड तालुक्यात पावसाची उसंत, रोपलावणी खोळंबली


चंदगड / प्रतिनिधी
गेले चार दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शेतीकामांना वेग आला होता. जनजीवनही विस्कळीत झाले होते. मात्र आज दिवसभर पावसाने काहीशी उसंत दिली. गेले दोन तीन दिवस पाऊस सुरु असल्याने शेतीकामांना वेग आला होता. आज दिवसभर पावसाने उसंत दिल्याने शेतीकामे खोळंबली आहेत. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: रोपलावण पध्दतीने भातपिकाची लावण केली जाते. पावसाने उसंत दिल्याने रोपलावणीची कामे खोळंबली आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 66.00 तर आतापर्यंत 361.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगड सर्कलमध्ये -99, नागणवाडी 69, माणगाव 39, कोवाड 10, तुर्केवाडी 72, हेरे 107 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान काल सायंकाळी मौजे शिरगांव येथील सुरेश रवळु कुंदेकर यांच्या गोठयावर झाड पडून अंदाजे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment