किणी प्राथमिक शाळेला पदवीधर शिक्षकासाठी ग्रामस्थांनी ठोकले टाळे, आश्वासनानंतर आंदोलन मागे - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2019

किणी प्राथमिक शाळेला पदवीधर शिक्षकासाठी ग्रामस्थांनी ठोकले टाळे, आश्वासनानंतर आंदोलन मागे

किणी (ता. चंदगड)  येथील प्राथमिक शाळेला पदवीधर शिक्षकाच्या मागणीसाठी टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
चंदगड / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेमध्ये शंभर विद्यार्थी पहिली ते सातवीच्या वर्गात शिक्षणत घेत आहेत. या मुलांना शिकविण्यासाठी सद्या चार शिक्षक आहेत. मात्र येथील पदवीधर शिक्षकांचे पद 2017 पासून रिक्त आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आंदोलन करत प्राथमिक शाळेला टाळे ठोकले. यावेळी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार व केंद्रप्रमुख वाय. आर. निटूरकर यांच्या उपस्थितीत त्रस्त नागरिकांनी त्यांच्याकडून एक महिन्याच्या आत पदवीधर शिक्षकांची नियुक्त करण्याचे आश्वासन घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
किणी प्राथमिक शाळेत 2017 पासून पदवीधर नियुक्त शिक्षक हजर नाही. 2017 पासून एक शिक्षक (DIECPD) कोल्हापूर येथे प्रतिनियुक्ती करण्यात आले  आहेत. पण त्यांची हजेरी किणी प्राथमिक शाळेत आहे. शाळेमध्ये पदवीधर शिक्षक नसल्यामुळे शैक्षणिक नुकसानही होत आहे. यासाठी ग्रामपंचायत व त्रस्त ग्रामस्थांनी आज शाळेला टाळे ठोकले. यावेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद मोटूरे,  सरपंच वसंत सुतार, शालेय शिक्षण व्यवस्थापन कमिटी सदस्य वसंत जोशीलकर, संजय कुट्रे, परशराम हुंदळेवाडकर, रणजीत गणाचारी, बाबू मोटूरे, आनंद जोशिलकर, संभाजी मनवाडकर, प्रकाश भिंबर, विठ्ठल कुंभार, ज्योतिबा बिर्जे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment