![]() |
मलतवाडी (ता. चंदगड) येथील शाळेला प्रयोगशाळा साहित्य प्रदान करताना सरपंच, उपसरपंच ,सदस्य व शिक्षक. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
मलतवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीमार्फत येथील जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी विद्यालय प्राथमिक शाळेस नुकतेच प्रयोगशाळा साहित्य प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा गावचे उपसरपंच नारायण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच तानाजी पाटील व केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील उपस्थित होते.
स्वागत मुख्याध्यापक सुधीर मुतकेकर यांनी केले. प्रास्ताविक एस के पाटील यांनी केले. १४ वा वित्त आयोग मधून ग्रामपंचायत मार्फत शाळेला संपूर्ण प्रयोगशाळा साहित्य, साऊंड सिस्टिम, वाटर फिल्टर, चार अँड्रॉइड टीव्ही, संपूर्ण शाळा इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंतींसाठी चित्रे व लेखन इत्यादी हजारो रुपयांची कामे गेल्या दोन-तीन वर्षात केल्याचे सरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे योगदान आदर्शवत असल्याचे सांगताना जि. प. शाळांच्या भौतिक सुविधा व सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने अग्रेसर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी शाळेतून बदली झालेले शिक्षक गणपती लोहार व महादेव नाईक यांना निरोप देण्यात आला. त्यांनी शाळेला भांडी संच भेट दिला. शाळेत नवीन आलेले शिक्षक विनायक कुंभार व उत्तम नार्वेकर यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास दीपा पाटील, अनिता सुतार, मायापा पाटील, पुन्नेश्वर सुतार, सुनंदा सुंडकर, गीता पाटील, सुमन पद्माकर, ग्रामसेवक नीळकंठ सांबरेकर आदिसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रमिला कुंभार यांनी केले आभार निवृत्ती पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment