कोवाड महाविद्यालयामार्फत पाचशे रोपांची वृक्षलागवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2019

कोवाड महाविद्यालयामार्फत पाचशे रोपांची वृक्षलागवड

कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालयात समाजोपयोगी  वृक्षांचे रोपण करताना डॉ. ए. एस. जांभळे यांचेसह संचालक मंडळ, प्राचार्य व प्राध्यापक आदी.
कोवाड / प्रतिनिधी 
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने ५०० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थाध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाकडून दरवर्षी महाविद्यालयात एक व्यक्ती एक झाड हा कार्यक्रम राबविला जातो.  यावर्षीच्या वृक्षारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे लिंबू, आवळा, जांभूळ, चिंच, गुलमोहर, करंजा, सिताफळ, काजू इत्यादी समाजोपयोगी झाडांची लागवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे नियोजन एन. एस. एस. विभाग प्रमुख डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले. यावेळी संचालक गुंडू सावंत, प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर,  प्रा. एस. एम. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. आर. डी. कांबळे यांनी केले तर आभार डॉ. के. पी. वाघमारे यांनी मानले.




No comments:

Post a Comment