सलग दुसऱ्या दिवशी तीनही बंधारे पाण्याखाली, पाच घरांच्या भिंती पडून साडेतीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2019

सलग दुसऱ्या दिवशी तीनही बंधारे पाण्याखाली, पाच घरांच्या भिंती पडून साडेतीन लाखांचे नुकसान

चंदगड तालुक्यात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे कोनेवाडी बंधाऱ्यावर आलेले पाणी.
चंदगड / प्रतिनिधी
गेले आठवडार सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दिवसभरही पावसाचा जोर कायम असून कोनेवाडी, हल्लारवाडी व करंजगाव हे बंधारे आजही सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखालीच आहेत. तर चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुलाच्या अलिकडे असलेल्या ओढ्याच्या वरुन पाणी वाहत आहे. मात्र अद्यापही चंदगड पुलावरुन पाणी जात नसल्यामुळे या मार्गावरील वाहतुक सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री हा चंदगड-हेरे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 65 तर आतापर्यंत 868.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडलनिहाय पाऊस चंदगड -75 मिमी (977), नागणवाडी -72मिमी (773), माणगाव -35मिमी (278), कोवाड -28मिमी (294), तुर्केवाडी -44मिमी (947), हेरे -136मिमी (1507) असा झाला आहे. अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्यातील मौजे हेरे येथील चंद्रकांत मालोजी कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 50000 चे नुकसान, मौजे हेरे येथील रामचंद्र हरिचंद्र शिरोडकर यांच्या घराची भिंत कोसळून 50000 नुकसान, मौजे पाटणे येथील हिटलर जुजे सालदान यांचे पूर्ण घरी पडून 200000 चे नुकसान, 4) मौजे पाटणे येथील बाबू नारायण दळवी यांच्या घराची भिंत पडून 30000 चे नुकसान, मौजे जेलुगडे येथील शिवाजी नारायण गावडे यांच्या जनावराच्या गोठ्याची भिंत कोसळून 25000 नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment