किणी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2019

किणी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

किणी येथे वृक्षारोपण करताना तलाठी सरपंच उपसरपंच व एक दिवस गावासाठी मंडळाचे कार्यकर्ते
कालकुंद्री / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथे 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत व "एक दिवस गावासाठीचे " कार्यकर्ते, जय प्रकाश विद्यालय व मराठी विद्यामंदिरचे विद्यार्थी यांच्या समवेत गावातून झांन्ज पथकाच्या गजरात पर्यावरण विषयावरील घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. त्यानंतर गायरान व रस्त्याच्या दुतर्फा जंगली व काजू रोपांचे  तलाठी राहूल सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीमेतील सर्वांचा समुहिक सहभाग उत्साह वर्धक होता. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कुट्रे यांनी कडुलिंब आदी विविध जातीची ३००  रोपे देणगी दिली. या प्रसंगी सरपंच वसंत सुतार, उपसरपंच  परशराम हूदळेवाडकर, सदस्य वसंत जोशीलकर, ग्रामसेवक डी. एम. नाईक "एकदिवस गावासाठी " मंडळ चे कार्यकर्ते संजय कुट्रे, पांडुरंग मोहनगेकर, गोपाळ कुंभार ,डॉ, नामदेव कुट्रे यांचेसह  मारुती  हन्नूरकर ,विरुपाक्ष किणीकर ,विष्णू गवंडी, संभाजी पुजारी दिलीप बिर्जे, विलास पाटील,  अरुण सुतार आदी ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक उपस्तिथ होते.

No comments:

Post a Comment