अध्यापक संघाच्या वतीने मराठीच्या शिक्षकांचा प्रेरणा पुरस्काराने सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2019

अध्यापक संघाच्या वतीने मराठीच्या शिक्षकांचा प्रेरणा पुरस्काराने सन्मान

जी. आर. कांबळे           एस. जी. साबळे      एच. आर. पाऊसकर       एस. पी. पाटील
चंदगड / प्रतिनिधी 
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. मातृभाषेची गोडी लावण्यापासून ते विद्यार्थ्यांना लेखन, वाचन कौशल्य विकसित करण्याच्या प्रवासात मराठी अध्यापकांची एक मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका असते. विद्यालयातील विविध उपक्रम, मराठी विषयाचा शंभर टक्के निकाल, साहित्य संमेलनातील सहभाग याच कामाचे कौतुक म्हणून मराठी अध्यापक संघामार्फत चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार देऊन अध्यापकांना गौरविण्यात करण्यात आला. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. जी. आर. कांबळे (व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालय, कागणी), एस. जी. साबळे (दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड), एच. आर. पाऊसकर (धनंजय विद्यालय, नागनवाडी), एस. पी. पाटील (श्रीराम विद्यालय,  कोवाड) या मराठी विषय अध्यापकांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एम. शिवणगेकर होते. प्रास्ताविक बी. एन. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य ए. एस. पाटील,  प्राचार्य व्ही. जी. तुपारे होते. कार्यक्रमाला आर. जे. पाटील,  जी. व्ही. गावडे, एच. एम. कांबळे,  जी. एन. धुमाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविंद्र पाटील यांनी तर आभार व्ही. एल. सुतार यांनी केले.

No comments:

Post a Comment