हत्तीवडे गव्याच्या हल्यातील शेतकरी दिनकर पाटील यांना वनविभागाकडून धनादेश - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2019

हत्तीवडे गव्याच्या हल्यातील शेतकरी दिनकर पाटील यांना वनविभागाकडून धनादेश

हत्तीवडे (ता. आजरा) येथील गव्याच्या हल्यातील जखमी दिनकर पाटील यांना मदत मिळवून दिली. 
आजरा / प्रतिनिधी
दिनकर पाटील (रा. हत्तीवडे) हे काही दिवसापुर्वी गव्याच्या हल्यात जखमी झाले होते. त्यावेळी अनेक लोकांनी शासनस्तरावरून मदत मिळवुन देण्याची ग्वाही दिली होती. पण या शेतकऱ्याची व्यथा कोणाला कळली नाही. मात्र अनिरुध्द रेडेकर यांनी या शेतकऱ्याची भेट घेवून त्यांची व्यथा जाणून घेतली. या प्रकरणी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला. याकामी त्यांनी हत्तीवडे गावचे सरपंच सुहास जोंधळे, पोलिस पाटिल विजय पाटिल,विलास कुंभार यांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या विषेश सहकार्यातुन १,२५००० (एक लाख पंचवीस हजार) रुपयांचा धनादेश  वनविभागामार्फत श्री. पाटील यांना मिळवुन दिला. यावेळी श्री. पाटील यांना धनादेश देतेवेळी शिवसेना नगरसेवक संभाजी पाटील, शिवसेना आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, भाजप गडहिंग्लज सरचिटणीस विजय मगदुम, वनरक्षक कृष्णा डेळेकर, यशवंत चव्हाण, मारुती चौगुले, जोतिबा चौगुले आणि हत्तीवडे ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments:

Post a Comment