चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यात लवकरच शेतीमालावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार आहे. येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्रक्रिया सहकारी संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर पत्रकारांना माहिती देताना सुनील शिंत्रे यांनी सांगितले. चंदगड तालुका हा नैसर्गिक विविधतेने नटलेला तालुका आहे. येथील लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन शेती हे आहे. तालुक्यातील साखर कारखाने व छोटे-मोठे काजूप्रक्रिया उद्योग वगळता कोणतेही व्यवसाय सुरू झालेले नाही नाचना बटाटे रताळी यासारख्या मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणार्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग होणे गरजेचे आहे. हे अशा प्रकारचे उद्योग उभारल्यानंतर येथील शेतीमालाला योग्य भाव व बेकार तरुणांच्या हाताला उद्योग मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. यातील पहिला टप्पा बिजूर येथे सारथी नाचना प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्प सुरू करणार आहे. याकरिता आवश्यक असणारी 25 एकर शेतजमीन खरेदी करण्यात आलेली असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली. या संस्थेच्या प्रवर्तक मंडळांमध्ये महादेव गुरव, विनायक कुंभार ,गुंडू वाके, रवींद्र कसबल्ले,सुशील दळवी, महेश पाटील ,पुंडलिक पाटील, लक्ष्मण मनवाडकर, रत्नाकर भोगण, भरमाण्णा पाटील ,नंदकुमार गावडे ,बळीराम पाटील इत्यादींचा समावेश आहे. सार्थी नाचना प्रक्रिया सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र सहाय्यक निबंध एस बी येजरे यांच्याकडून स्वीकारताना सुनील शिंत्रे नागेश चौगुले, संतोष मळवीकर ,रवी कसबल्ले ,राहुल शिरकोळे ,विठ्ठल बागडी, अशोक सावंत, सुधीर मोेरे, दत्तात्रय देसाई, ई व प्रवर्तक मंडळ उपस्थित होते संस्था नोंदणीसाठी मुख्य लिपिक के आर कोळी कनिष्ठ लिपिक एस वि सावंत व उमेश केली यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment