चंदगडच्या स्पर्धा परीक्षा व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपन करताना ग्रुपचे सदस्य. |
चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रुप( व्हाट्सअप) या उपक्रमशील समूहामार्फत चंदगड तालुक्यात दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार व हलकर्णी एमआयडीसीमध्ये वृक्षरोपण असा संयुक्त कार्यक्रम झाला.
दहावी मध्ये 97% घेऊन चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या संजय गांधी विद्यालय नागणवाडीच्या कु. वसुधा निंगाप्पा गावडे या विद्यार्थिनीचा सत्कार ज्ञानेश्वर मुळे (निवृत्त परराष्ट्र सचिव IFS) लिखित "माती पंख आणि आकाश" हे पुस्तक व स्पर्धापरीक्षा लेखक जॉर्ज क्रूझ लिखित "पोस्ट काढायची गोष्ट" व वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रुपमध्ये आयपीएस, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आपत्तीव्यवस्थापन अधिकारी, राज्यकर अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पीएसआय, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, लेखक, कवी, विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक, ज्येष्ठ विचारवंत, स्पर्धापरीक्षा लेखक, पत्रकार या सर्व अनुभवी व्यक्तींचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन ग्रुपमधील सर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारा हा तालुक्यातील एकमेव ग्रुप ठरत आहे. प्रास्ताविक प्रसाद पाटील यांनी जैवविविधतेने नटलेल्या या तालुक्यात युवकांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड व संगोपन करून ती अधिक समृद्ध करण्याचे आवाहन केले. "आर्मी, एमपीएससी, डिफेन्स सर्विस या परीक्षेची तयारी ही सर्वांना अधिक उत्तमरित्या व सामूहिक रित्या तयारी करता यावी हा या ग्रुपचा उद्देश असून येत्या काळात ही अभ्यासाची चळवळ अधिक व्यापक करूया" असे प्रतिपादन स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन ग्रुपचे संस्थापक कमलेश जाधव यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कृषी पदवीधर गजानन कदम यांनी निसर्गाचे महत्त्व व शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीबद्दल प्रत्येक व्यक्तीचे यातील योगदान याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला ग्रुपमधील सदस्य मनोज देसाई, महेश पाटील, अण्णा भिकले, अर्जुन टक्केकर, नंदकुमार जाधव, विठ्ठल जाधव, एमआयडीसी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्तिक पाटील यांनी केले तर आभार कवी प्रमोद चांदेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment