चंदगड पोलिसांकडून ८३ हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2019

चंदगड पोलिसांकडून ८३ हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई

संग्रहित छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
पावसाळी   पर्यटनाच्या नावाखाली   मद्यधुंद अवस्थेत नंगानाच करत आंबोली, तिलारी सारख्या पर्यटनस्थळी भरधाव जाणाऱ्या 83 पर्यटकांवर आज चंदगड पोलिसांनी कारवाई करून 32 हजार रूपयांचा दंड वसूल केला. बेळगाववरून आंबोलीला जाणाऱ्या पर्यटकांचा  नाहक त्रास चंदगड तालूक्यातील  नागरिकांना  सहन करावा लागत आहे. त्यामुळे चंदगड  पोलिसांनी या अतिउत्साही पर्यटकवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली. त्यानुसार आज चंदगड पोलिसांनी तडशिनहाळ येथील  टोल नाक्याजवळ तपासणी नाका लावून पर्यटकांची झाडाझडती घेतली. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली. पो. नि. अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप येसादे, दीपक पाचवडेकर, दिलीप पाटील, अमर सायेकर, रामदास किल्लेदार आदींनी हि कारवाई केली. पावसाळ्यात चंदगड तालुक्यात पारगड, स्वप्नवेल, तिलारी सवतकुळ(सुंडी) तसेच आंबोली, आंबोली धबधबा, कावळेसाद, नांगरतास धबधबा अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. 


No comments:

Post a Comment