चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2019

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना पुष्पगुच्छ देवून कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यी. 
कोवाड / प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या आजच्या दिवशी चंदगड तालुक्यात आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विशेषत: सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्यामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी झाली. कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत आज गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपती लोहार यांनी केले. यावेळी श्रीकांत पाटील यांनी व्यास पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा महात्म्य सांगताना गुरु व्यास यांनी सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद व अथर्ववेद या वेदांचा सखोल अभ्यास करून त्यावरील भाष्य लोकांच्या समोर स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांच्या जीवनावरील अनेक  बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी भावना आतवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले.  विद्यार्थी वेदांती सुर्यवंशी, प्रांजल पाटील, पियुशा यादव,  आफताब मुल्ला यांनी शिक्षक गुरुंना शुभेच्छा देणारी भाषणे केली. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांसह शिक्षक श्रीकांत आप्पाजी पाटील मधुमती गवस, उज्वला नेसरकर, कविता पाटील आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्प देऊन गुरुवंदन केले. आभार मधुमती गवस यांनी मानले.



No comments:

Post a Comment