तेऊरवाडी / प्रतिनिधी
चंदगडी साहित्य रत्न या व्हाट्सएप ग्रुपवर नुकतेच दुसरे ऑनलाईन कवी संमेलन झाले. तालुक्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कवींनी आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण करून रंगत आणली. सुमारे एक तास चाललेल्या कार्यक्रमात निसर्ग, शिक्षण, नातेसंबध, परंपरा, प्रेम, शेतकऱ्यांच्या व्यथा, सामाजिक व्यवस्था मांडण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारंपारिक कार्यक्रमांचा आवाका विस्तारित करण्याबरोबरच आनंद द्विगुणीत करणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला.
तालुक्यातील विविध क्षेत्रातील साहित्यप्रेमीनी एकत्र येऊन चंदगडी साहित्य रत्न हा व्हाट्सएप गुप चालवला आहे. आपल्या मनातील साहित्यिक संकल्पना रोजच्या रोज याग्रुप वर व्यक्त केल्या जातात. नव साहित्यिकांना सामावून घेतले जाते. ग्रुपच्या वतीने ऑनलाईन पावसाळी काव्य संमेलन घेण्याचा मनोदय व्यवत्त झाला. प्रमोद चांदेकर, संजय साबळे , हणमंत पाटील आदिनी यासाठी नियोजन केले. सुप्रसिद कवी अनंत राऊत ( विदर्भ ) यांच्या अध्यक्षतेखाली हे काव्य संमेलन पार पडले. यामध्ये हणमंत पाटील यांची 'वाढ गं माय 'संजय साबळे यांची 'आई ' माणिक नागावे यांची ' सय माहेरची 'कार्तिक पाटील यांची 'बाबासाहेबांच्या शोधात ' प्रमोद चांदेकर यांची ' 'बायका बोलतात ' ईरापा पाटील यांची ' 'आजकालच प्रेम ' सुभाष बेळगावकर यांची 'पहाट निसर्गाची ' कृष्णा पाटील यांची 'कळायला लागलयं तीला 'जयवंत जाधव यांची 'वृद्धत्व ' या कवितांना चांगला प्रतिसाद मिळाला. संमेलानाध्यक्ष विदर्भीय कवी अनंत राऊत यांनी नवोदित कवींना मार्गदर्शन करून आपल्या 'मायबाप ' व 'प्रेम ' या दोन कवितांनी संमेलनाची उंची गाठली. सदानंद पुंडपाळ, सुनिल कोंडूसकर, नारायण गडकरी, एम. के. पाटील, सुनिल पाटील, के. जे. पाटील, डी. एच. पाटील ,भरमू खाडे, सौ. विजया उरणकर यांनी परीक्षण केले. आभार कार्तिक पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment