कालकुंद्री / प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी चिकाटी व कष्टा बरोबरच शिस्त व संस्कार महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी हे गुण अंगी बाणवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहिले. तर शिक्षक व पालकांना अपेक्षित असलेले
सुजान नागरिक घडतील असे प्रतिपादन जीवन शिक्षण संस्था पाटणेचे अध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले. ते व्ही के चव्हाण पाटील विद्यालय कागणी (ता. चंदगड) येथे दहावी विद्यार्थी गुणगौरव व नवागत स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्वागत मुख्याध्यापक ए. जे. देसाई यांनी केले. प्रस्ताविक जी. आर. कांबळे यांनी केले. दहावीत दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रा. बी जी खाडे यांच्या आईच्या स्मरणार्थ दिले जाणारे सन्मानचिन्ह व रोख रक्कम अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिक्षक पतसंस्था चंदगडचे चेअरमन एस. डी. कोकितकर यांनी यावर्षी प्रथम आलेल्या तीन क्रमांकांना स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवले. यात अनुक्रमे पल्लवी दशरथ पाटील, मेघा मारुती तराळ, पल्लवी रवींद्र खानापुरे यांचा समावेश आहे. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच नूतन शालेय मंत्रिमंडळाचे स्वागत एस. आर. पाटील व एम. ए. हगीदळे यांच्या हस्ते झाले .यावेळी एस. आर. गुंडकल ,कांचन जोशी, नागप्पा पुजारी, बंडू पाटील, हनुमंत पाटील, दशरथ पाटील, रामचंद्र चव्हाण आदी शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार डी. एम. जाधव यांनी मानले.
No comments:
Post a Comment