बेळगाव येथे २० रोजी राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2019

बेळगाव येथे २० रोजी राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


कालकुंद्री / प्रतिनिधी
बेळगाव  येथील आरपीडी महाविद्यालयात शनिवार २० जुलै रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय पातळीवरील हिंदी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी "शिक्षा का उद्देश : अंक या ज्ञान?" हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ५०००, ४०००,३००० तर प्रोत्साहनपर चार स्पर्धकांना प्रत्येकी १५०० रुपये व मानपत्र देण्यात येणार आहे. बेळगाव सीमाभागासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. देशातील प्रत्येक महाविद्यालयातील  दोन स्पर्धकांना या स्पर्धेत प्रवेश असून त्यांनी महाविद्यालयाची  आयडी किंवा अधिकृत पत्रासह आरपीडीच्या प्राचार्या डॉ. आचला देसाई, हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पवार ७९७५९५०४९६, डॉ. विजयकुमार पाटील - ९३४२६७२७८४ , डॉ. अजित कोळी ८९७१२६१३०४ यांचेकडे दिनांक १६ जुलै अखेर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment