चंदगड येथे पोस्टाचे एटीएम सुरु होण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2019

चंदगड येथे पोस्टाचे एटीएम सुरु होण्याची गरज

चंदगड पोस्ट ऑफिस
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याचे ठिकाण असून तालुक्याचा विस्तार मोठा आहे. ४०ते ५० किलोमीटर अंतरावरून या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये लोक येत असतात. चंदगड तालुक्यातील सेवा निवृत्ती सैनिक व शहीद सैनिककांच्या कुटुंबातील सदस्य, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक इ. संख्या लक्षणीय आहे. या लोकांना पोस्टातील खात्याशी व्यवहार करताना दमछाक होते. कारण पोस्टाचे कामकाज 11 ते 2 वाजेपर्यंत असते. या नंतर पैसे भरणे काढणे व्यवहार बंद होतात. निवृत्त सैनिकाच्या व शहीद सैनिक कांचे कुटुंबातील सदस्य यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कारण घरातून सकाळी ७ ते ८ वाजता निघावे लागते. त्यानंतर पोस्टखात्याचे ऑफिस मध्ये काम करावे लागते. नाहीतर दिवस वाया जातो. हे हेलपाटे होऊ नये म्हणून जर एटीम सुरू झाले तर पोस्ट ऑफिस मधील खातेदारांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पोस्ट खात्याच्या संबंधित वरिष्ट अधिकाऱ्यांनी चंदगडला एटीएम सेवा सुरु करुन खातेदारांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment