![]() |
निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना द . य . कांबळे , डॉ . प्रकाश दुकळे , सूर्याजी ओऊळकर , विष्णू कार्वेकर आणि जॉनी फर्नांडीस
|
चंदगड / प्रतिनिधी-
मौजे कार्वे (ता. चंदगड ) येथील सरस्वती वाचनालयास कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श वाचनालय ( ब वर्ग ) पुरस्कार प्राप्त झाला. तसेच या ग्रंथालयाचे ग्रंथपाल जॉनी काजमिल फर्नांडीस यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार निवृत्त परराष्ट्र सचिव आणि ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभानिमित्त जिल्हयातील नामवंत लेखक , कवी , वक्ते आणि आदर्श वाचनालय , ग्रंथपाल , कार्यकरते यांचा सन्मान करण्यात आला . सरस्वती वाचनालयाने आतापर्यंत राबविलेले विविध उपक्रम , व्याख्यानमाला , करिअर मार्गदर्शन , उत्कृष्ट वाचक निवड आणि तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार करण्याची परंपरा जोपासली आहे . वाचनालयात स्पर्धा परीक्षा, बाल व माहिला विभाग , संशोधन विभाग , वाचन कक्ष असे विभाग कार्यरत आहेत .कार्यालय संगणकीकृत आहे . दहा हजारहुन अधिक ग्रंथ , नियतकालिके आणि वृत्तपत्रांनी वाचनालय समृद्ध आहे . ग्रंथालयशास्त्राच्या सर्व निकषांना अनुकूल असे कार्य उभे केले आहे . त्यामुळेच ब वर्गातील आदर्श वाचनालय पुरस्कार प्राप्त झाला . यापूर्वी वाचनालयाला आजरा येथील गंगामाई वाचन मंदिराचा आदर्श वाचनालय पुरस्कार प्राप्त झाला आहे . तसेच जिल्यातील ग्रंथपालांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती . त्यातून जॉनी फर्नांडीस यांची आदर्श ग्रंथपाल म्हणून निवड झाली . पुरस्कार स्वीकारण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष द . य . कांबळे , उपाध्यक्ष डॉ . प्रकाश दुकळे , सचिव सूर्याजी ओऊळकर , संचालक विष्णू कार्वेकर आणि ग्रंथपाल जॉनी फर्नांडीस उपस्थित होते .
No comments:
Post a Comment