![]() |
धोंडीबा आप्पाजी बिजगर्णीकर |
चंदगड तालुक्यातील बेळगाव-वेगुर्ला मार्गावरील सुपे बस स्टॉप जवळ भरधाव कारने सायकलस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात धोंडीबा आप्पाजी बिजगर्णीकर (रा. सुपे) हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. ते गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी बेळगाव येथे नेले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. आज रविवार असल्याने पर्यटकांच्या गाड्या धावत असतात. कर्नाटक पासिंगची (केए-25, झेड 9284) या इर्टिका कारणे जोराची धडक दिल्यानंतर बिजगर्णीकर रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यात त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी बेळगावातील सरकारी इस्पितळात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वर्षासहलीसाठी कर्नाटकातील अनेक युवक मद्यपान करून भरधाव वेगाने गाड्या चालवत असतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्या पादचाऱ्यांना व इतर गाडी चालकाना याचा नाहक त्रास होतो. चंदगड पोलिसांनी दर रविवारी अशा भरधाव वेगाने जाणाऱ्या युवकांच्या गाड्यांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी चंदगड वाशीयातून होत आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
No comments:
Post a Comment