कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2019

कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन


 कलाकारांचे मानधन दरमहा वेळेत मिळावे व अन्य मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाच्या वतीने जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चंदगड / प्रतिनिधी
कलाकारांना उतारवयातील आयुष्य चांगले जाणेसाठी सरकारने कलाकारांना मानधन मंजूर करण्यात आले आहे या मानधनमंजूरीत काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी शासनाने दुरुस्त करुन वयोवृद्ध कलाकारांना दिलासा द्यावा. कलाकारांना नवसंजीवनी प्राप्त करुन द्यावी. यासह अन्य मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कलाकारांचे मानधन पाच महिनेचे थकित आहे ते ताबडतोब द्यावे, कलाकारांचे प्रत्येक महिन्याचे मानधन एक तारखेला खात्यावर वर्ग करावे, ऑनलाईन मानधन रेग्युलर सुरु केलेपासून कलाकारांना मागील थकीत 16 महिन्याचे 2700/- रुपये खात्यावर वर्ग करावेत, कलाकार मयत वारस महिलांना ऑनलाईन मानधन सुरु झालेपासून आजतागायत मानधन मिळालेले नाही ते त्यांच्या खात्यावर ताबोडतोड़ वर्ग करावेत, कलाकारांना कलाकार असल्याचे शासनाचे ओळखपत्र मिळावे, प्रत्येक जिल्ह्याला कलाकार मानधन मंजुरी उद्दिष्ट 60 आहे ते वाढवून 200 कलाकारांना मानधन मंजुरी करुन मिळावे, कलाकारांना `अ` वर्गाला 5000 रु. `ब` वर्गाला 4000 रु. `क` वर्गाला 3000 रु. मानधन वाढ करुन तरतूद करावी व 2017 पासून द्यावे, कलाकारांना घरकुल मंजूर करणेत यावे, त्याला उत्पन्नाची अट असू नये, कलाकारांची कलेची चाचणी घेऊनच मानधन मंजूरी करणेत यावे म्हणजे बोगस होणार नाही, जि. प. शाळेत संगीत शिक्षक असावा, कलाकारांची मुले व नातेवाईकांना उच्च शिक्षण मोफत मिळावे, कलाकारांच्या मानधन मंजुरीची उत्पन्न अट रद्द करावी, मानधन मंजुरीचे वय 50 ऎवजी 45 वर्षे करावी, सांस्कृतिक सोंगी भजन तमाशा, कलापथक, आर्केष्ट्रा कार्यक्रम करणाऱ्या संस्थांना दोन लाख उत्पन्न द्यावे, कलाकारांचे विभागीय मंडळ स्थापन करुन त्यावर कलाकारांना सभासद व संचालक मंडळ म्हणून नेमणूक करावे, कलाकारांचेमधून एक आमदारपद नियुक्त करणेत यावे, कलाकार मानधन समितीच्या अशासकीय सदस्यांना भत्ता मिळावा, कलाकारांना बस रेल्वे विमान प्रवास मोफत असावा, कलाकारांना आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात अशा कलाकारांचे उर्वरित आयुष्य चांगले जाण्यासाठी त्यांच्या मागण्या पुर्ण कराव्यात अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर विजयकुमार कांबळे, रामदास बागडी, नामदेव पाटील, शांताराम बापू पाटील, आप्पाजी चव्हाण, रुक्माणा सुतार यांना वरील निवेदन सादर केले आहे. विष्णू गोंधळे, नारायण लोहार, नामदेव पाटील, रुक्माणा सुतार, आप्पाजी चव्हाण, मारुती पाटील, सातेरी बसरीकट्टी, सुरेश सुतार, बबन बागडी, गोविंद गोंधळी, गणपतरा देसाई, पांडुरंग डगवेकर, अरुण वाजंत्री यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




No comments:

Post a Comment