![]() |
तानाजी डोंगरे |
चंदगडच्या दुय्यम निबंधक वर्ग १ यापदी तानाजी श्रीपतराव डोंगरे रूजू झाले आहेत. तीन वर्षांनंतर चंदगड तालुक्यात कायम स्वरूपी अधिकारी मिळाल्याने विविध प्रकारच्या दस्त नोदणीची कामे आता लवकर होणार आहेत. त्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. तीन वर्षांपूर्वी कायमस्वरूपी दुय्यम निबंधक असलेले एस. डी. मोरे यांची बदली झालेने हे पद रिक्त होते. त्यामुळे आठ-दहा दिवसातून चंदगडला बदली अधिकारी येत होते. त्यामुळे शेतकरी, बँका यांचे खरेदी -विक्री दस्त रखडले जायचे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. चंदगडला आता कायम स्वरूपी अधिकारी दिल्याने खरेदी विक्रीची कामे वेळेत होतील. तानाजी डोंगरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन ते या जागी रुजु झाले आहेत. यापूर्वी ते मूरूड (लातूर) येथील कार्यभार होता. ते मुळचे कोल्हापूर येथील आहेत.
No comments:
Post a Comment