जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन - प्राचार्य ए. एस. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2019

जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन - प्राचार्य ए. एस. पाटील

कार्वे (ता. चंदगड) येथे आयोजित मराठी अध्यापक संघामार्फत आयोजित दहावी परीक्षेतील मराठी विषयातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रेरणा पुरस्कार कार्यक्रमात बोलताना प्राचार्य ए. एस. पाटील. शेजारी उपस्थित शिक्षक.
चंदगड / प्रतिनिधी 
वाचन हा एक छंद आहे. तो जोपासला तर सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. अनेक संकटावर मात करण्याच्या वाटा वाचनाच्या महामार्गावर सापडतात. जगणं समृध्द करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय असे प्रतिपादन प्राचार्य ए. एस. पाटील यांनी केले. कार्वे (ता. चंदगड) येथे मराठी अध्यापक संघामार्फत आयोजित दहावी परीक्षेतील मराठी विषयातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रेरणा पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रास्ताविक बी. एन. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एन. शिवणगेकर होते. 
यावेळी दहावी परीक्षेतील मराठी विषयात ९० गुणांपेक्षा जास्त गुण पडलेल्या ३५ विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. चंदगड प्रेरणा पुरस्कार  जी. आर. कांबळे (व्ही. के. चव्हाण विद्यालय कागणी), एच. आर. पाऊसकर (धनंजय विद्यालय नागनवाडी), एस. जी. साबळे (दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड) एस. पी. पाटील (श्रीराम विद्यालय कोवाड), एस. एल. बेळगावकर (सरस्वती विद्यालय कालकुंद्री) यांना देऊन गौरविण्यात आले. जे. व्ही. दुकळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्या आला. 'ज्ञान हे चिरंतन टिकणारे धन आहे. ते टिकवायचे आणि वाढवायचे असेल तर वाचन हाच मार्ग आहे. वाचन आणि लेखन यातूनच आपली मराठी भाषा समृद्ध होईल.' असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांनी केले. यावेळी जे. व्ही. दुकळे,  प्रकाश बोकडे, एच. आर. पाऊसकर, एस. जी. साबळे, एस. पी. पाटील,  जी. आर. कांबळे, एस. एल. बेळगावकर यांची मनोगते झाली. कार्यक्रमाला आर. जे. पाटील, जी. व्ही. गावडे, एस. एम. कांबळे, जी. एन. धुमाळे, जी. आर. गवसेकर, आर. एन. देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र पाटील यानी तर आभार व्ही. एस. सुतार यांनी मानले.

No comments:

Post a Comment