जांबरे धरणाजवळ टस्कराचा वावर, भात रोप लागवडीचा प्रश्न ऐरणीवर - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2019

जांबरे धरणाजवळ टस्कराचा वावर, भात रोप लागवडीचा प्रश्न ऐरणीवर


चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात हत्तीचे आगमन झाले तरी पावसाळा सुरू झाल्यानंतर हत्ती परतत होते. मात्र यंदा हत्तीने चंदगड तालुक्यातील आपले वास्तव्य अद्याप सोडले नाही . चंदगड तालुक्यातील जांबरे  धरणाजवळ एक मोठा टस्कर गेल्या तीन-चार दिवसांपासून वावरत असून शेतकऱ्यांच्या  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भात नाचना ऊस पिकाचे टस्करांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे  .  सध्या  भातरोप लागवडीचा हंगाम सुरू असून रोप लागवड कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.
-चंदगड पासून दहा किलोमीटर अंतरावरा असणाऱ्या जांबरे गावातच ताम्रपर्णी नदीवर एक टीएमसी क्षमतेचे मध्यम पाटबंधारे प्रकल्प उभा राहिला आहे .या प्रकल्पात बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत .शिल्लक  जमिनीच्या तुकड्यातून शेतकरी उदरनिर्वाहाचा प्रयत्न करीत असताना वन्यप्राण्यांचा वावराने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जवळ पाण्याची सोय असल्यामुळे कधी गवे तर कधी हत्तीकडून शेतीच्या नुकसानीचे दृश्य नेहमी दिसते . टस्कराने गेल्या चार दिवसात प्राजक्ता गावडे ,विश्वनाथ देवान, नम्रता गावडे, गजानन गावडे, विष्णू गावडे, सुभाष कांबळे , बाबली गावडे, दशरत गावडे आदी शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे या वेळी चंदगडचे वनपाल डी.जी राक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन  पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या नुकसान देण्याचे आश्वासन दिले.गेले दोन दिवस वन विभागाचे कर्मचारी भर पावसात गस्त घालत असून हत्ती आपला मुक्काम हलवण्यास राजी नसल्याचे दिसून येत आहे.


No comments:

Post a Comment