उच्चपदस्थ नोकरीच्या ध्येयासाठी जिद्द आणि चिकाटीची गरज- गोपाळ पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2019

उच्चपदस्थ नोकरीच्या ध्येयासाठी जिद्द आणि चिकाटीची गरज- गोपाळ पाटील

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील, व्यासपीठावर शिक्षकवर्ग.
चंदगड / प्रतिनिधी
मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी  आपले ध्येय निश्चित करणे. ध्येयाचा ध्यास हा यशाच्या मार्गाकडे घेऊन जातो .आपली  स्वप्ने साकार होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असेल तर निश्चितपणे ध्येय साध्य करता येते  असे मत राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी व्यक्त केले चंदगड तालुक्यातील व्ही.के.चव्हाण -पाटील महाविद्यालयात आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या निमित्ताने ते बोलत होते .
मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित विद्यार्थ्यी.
सुरुवातीला राजेंद्र शिवणगेकर यांनी प्रास्तविक केल्यानंतर उपस्थिताचे स्वागत पी.व्ही.ढेरे यांनी केले. आज स्पर्धेचे युग असून प्रत्येकाला उच्चपदस्थ नोकरी मिळविण्याचा ध्यास लागला आहे पण सगळी  स्वप्न सत्यात उतरत नसतात त्यासाठी अभ्यासाची चिकाटी आणि  ध्यास यासाठी विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावावे लागते. स्पर्धा परीक्षेच्या  उज्ज्वल यशासाठी आपण सतत  चिकाटी कायम ठेवली तर यश खेचून आणता येते .स्पर्धा परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असते.उच्च पदस्थ अधिकारी वर्गाच्या नोकऱ्या कोणत्या त्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत,पेपर कसे सोडवावेत .त्यासाठीचे तंत्र कोणते.कमी वेळेत अभ्यास कसा करावा व यश संपादन करणे कसे सोपे आहे याबाबत सखोल मार्गदर्शन  राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी केले .चंदगड तालुक्यातील व्ही.के .चव्हाण- पाटील महाविद्यालयात ही मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होते . यावेळी व्यासपीठावर प्रा. प्रकाश बोकडे, प्रा. जी एस पाटील, प्रा.विलास नाईक ,प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार कमलेश जाधव यांनी मानले .

No comments:

Post a Comment